कुणाचंकायनकुणाचंकाय..

#कुणाच काय..?

कुणाला कुणाचं कौतुक असतं.
कुणाचं कुणी भावविश्व असतं.
कुणाला कुणाचं देणघेण नसतं.
कुणाला कुणालातरी काही द्यायचं असतं.

कुणाचं कुणावाचुन राहत नसतं.
कुणाला कुणावाचुन राहवतही नसतं.
कुणाला कुणी नसतं.
कुणाला सगळे असुन कुणाचचं गांभिर्य नसतं.

कुणाला कुणी आपलं म्हणुन विचारपुस करणारं,
तर कुणाला कुणी मायेन तोंडावरुन हात फिरवणार हवं असतं.
कुणाला कुणालातरी काही सांगायचं असतं,
कुणाला कुणाचच ऐकायचं नसतं.
तर कुणी कुणाचा एक बोल ऐकण्यास धजुन बसलेल असतं.

कुणाचं हसु कुणाला जगायला बळ देतं ,
कुणी कुणावर मुद्दाम मात्र हसायचं नसतं.
कुणाला कुणावर तरी रुसायचं असतं ,
कुणाला कुणाचं पाणावलेलं डोळं पुसायचं असतं.

कुणाला कधी बोलायला कुणीच नसतं ,
कुणाला बप्पा बस कर किती बोलतो
 असं म्हणायचं असतं, पण म्हणता येत नसतं.

कुणाचं कुणाकडं काम असतं.
कुणी कुणाकडं काम काढलेलं असतं.
पाहिलं तर जग आपलं पाहिल तर कुणीच नसतं.

कुणी कुणाला कुण्या वळणावर आठवत असतं.
कुणी कुणाच्या मनात साठतं असतं.

कुणी कुणाचा डोळा लावुन वाट पाहत असतं ,
कुणी कधी जातोय हा इथुन अस मनात म्हणत ताठत असतं.

 कुणाला कुणाचही चांगलं व्हाव असं वाटत असतं.
कुणाचं काळीच कुणासाठी तरी फाटत असतं.
कुणासाठी कुणी झिजत असतं.
कुणासाठी कुणी पावसात भिजत असतं.

कुणी कुणासाठी कुणासाठी कुढतं असतं,
कुणी कुणासाठी धडपडत असतं.
कुणाचं धेय्य कुणाचं स्वप्न असतं,
कुणाचं दु:ख ही देखणं असतं.

आयुष्यात कितीही बाका प्रसंग आला तरी एकट कधी पडतोय वाटुन घ्यायचं नसतं,
असं म्हणतात कि आलेला ढग निघुन जात असतो.
बदल संसार का नियम आहे तो घडत असतो...
आपल्या नसल्यानं या जगात फरक पडणार नाही ,पण आपल्या असण्यानं ठरवलं तर नक्कीच फरक पडत असतो....

कुणाला सहजात कोलायचं नसतं
आपलं खरं असुन मागे रेलायचं नसतं.
सगळ्यंना घेवुन चालायचं असतं.
प्रेमानं आपलेपणानं बोलायचं असतं.

कुणी आपलं म्हणुन वाट्टेल ते अन् 
परक्यास वार्यावर सोडायचं नसतं.
दु:ख ,अडचणी ,समस्या ,वादळ म्हणता येईल ते अशा बाबींना बिंधास्त भिडायचं  असतं.
वाळवंटातही खुरट्या झुडपासारखं तग धरुन टिकायचं असतं.
वेळप्रसंगी अंधाराचा नायनाट करण्यास सुर्यासारख नाही जमलं तरी ,दिवा म्हणुन "पण पेटायचं असतं".
                 
                 -आकाशसुमित्रासंपतरावमिठे










Comments

Popular posts from this blog

तिची वाट ..

#माझं चालतबोलत‌ विद्यापिठं