तिची वाट ..
ती आजही दररोज प्रमाणे याच्या गावी येणार आहे , तो ही दररोज प्रमाणे अलाराम लावुन सकाळ होण्याची वाट बघत रात्रभर याच्या स्वप्नात तिचा विचार करत झोपी कधी गेला याचही याला कधीच कळाल नाही..
सकाळ झाली आलाराम वाजला हाही त्याच तयारीत कधी वाजतोन कधी नाही याच्या ,लगेच पाटदिशी आवरुन , कॉलेजच्या बँग मध्ये एक दोन वह्या टाकुन खिशाला पेन लावत हेडफोन गळ्यात टाकत गावच्या एसटी पॉइंटकड गरबडीन निघाला , हिवाळ्याचे दिवस रस्त्याच्या बाजुला शेकोटी केलेली तिची वाट पाहत बसला तोवर शेकत,, तिची म्हंजी बसची याला तशी तिची वाट पाहण्याची गरज नव्हती कारण बसमधी फक्त कॉलेजच्या मुलीच घेवुन जायची ति बसही जवळच्या गावावरुन एक एक गाव करत मुली गोळा करत यायची लास्ट गाव याचचं,पण तिच्याशी याच नात त्याची ती त्यामधुन यायची म्हणुन जुळल होतं..
लांबुन धुराळा करत बस गावात येताना दिसतीय ,तो होणारच पोरी म्हणलंकी विषयच नाही..
बस जसजस जवळ येईल तशी याचीही धकधक वाढत चाललीय, बस गावातुन वळुन माघारी येते कारण ती जाताना पलिकडल्या बाजुला असल्यान दिसली नाही यालाही माहितीच होत ति कुठल्या सीटवर बसते म्हणुन त्या हिशोबान हा पटट्याही रोडच्या अलीकड उभा टाकलेला होता. बस वळुन आली पॉइंटला थांबली , कित्ती आतुरतेने वाट पाहत असुन सुद्धा तिच्याकडं पाहताना नजर साथ देत नव्हती ,स्वत स्वत:ला धीर देत तिच्याकड लोकांच्या नजरा चुकवत तिला बघत होता, तिही तिच्या मैत्रिणींसोबत हसत बोलता बोलता याच्या कड नजरांदाज केल्यासारख करत होती पण बघत होती, दोनच मिनीटात बस बघता बघता निघुन गेली बघता बघता....
याच्याही गावतला पिकप शाळेतल्या मुलांना घेवुन जायला तिथ तोपर्यंत आलच होत काहीच वेळात पेर जमा झाले हा पिकपला मागे लटकतलला पिकप धावताना येणारा वारा याच्या केसांना फुंकर मारत होता जणु तिच मारतेय असा भास याला होत हेता.. तिच्या विचारात कॉलेज कधी आल कळलच नाही..
कॉलेजला आल्यावर आधी याची नजर तिला कुठे बसलेली असलं म्हणुन शोधु लागली
कॉलेजातील झाडच्या खाली पोरी घोळका करुन बसल्या त्यात याची ती कल्ला करताना याला दिसली ,
मन सुखावल बघुन हाही तिथं सायकलच्या कँरेलवर एक पाय टाकुन ति्याकड बघत दोस्त लोकांशी गप्पा मारत होता..
टोल वाजला जन गण झाल पोर आपापल्या वर्गात शिरली हाही ती जरा रुबाबत एंट्री घेत वर्गात शिरला त्याला जिथुन ती व्यवस्थीत दिसल अश्या तिच्या बाजुच्या दोन रांगेच्या तिसर्या बँंचवर बसुन तिला कसुन पाहत होता.. तसा मराठी इतिहास, भुगोलात रस असाणार्या याला केमेस्टरीच क फिजीक्स च पी सुद्धा येत नव्हत ं तेव्हढं बायोलॉचीच जरा कळायच बर्यापैकी..
आपली खेड्याकडील अशी शिक्षणव्यवथाच अशी की याला तो अपवाद राहणार कसा..
तर आज तिला बोलन अस मनात कितीदा बोलणार हा आजही तिला बोलण्याचे आडाखे मनात बांधत होता, कॉलेज सुटल ति बसकडे निघाली तस हा ही दोस्तां सग तिच्या मागे मागे चालत तिला नजरे भरत चालत होता बस मध्ये ती शिरली तोही बाजुच्या चहाच्या होटेलात दोस्तांसंग शिरला चहा घेत घेत तिला तिथुन पाहत पाहत चाहाच घोट घेत होता, च्यायला प्रेमाच्या सुरुवातीला किती दिवस नुसत पाहण्यातच जातात राव पण यातही किती काही दडलेल असत याच हे त्यालाच माहिती असतं ..
त्याच्या या कथेची नायक म्हणुन तो मस्तपैकी भुमिका वटवत असतो
बस सुरु झाली बस हळुहळु वेग घेत होती तस याचाही तिला पाहता पाहता ति दिसणार नाही म्हणुन टक नजर लावुन तिच्याकडं बघत होता, ति उद्या कॉलेजला येणार होती पण तेवढा काळ त्याच्यासाठी काळासारखा समोर उभा टाकणार होता.
पुन्हा हे चक्र असच कित्येक दिवस असच चालणार होतं..कित्येक दिवस..
तिची वाट नक्की अशी किती दिवस..तिची वाट, पुढे काय..?
बर्याच दिवसांनी बरं महिन्यांनी म्हणा तिला मैत्रींणींच्या मध्यस्ती द्वारे अखेर विचारायच ठरवलं ,डायरेक्ट बोलण्याची धास्ती न दुसर काय?
तर तिच उत्तर अस की आमच्या घरी अस जमत नाही ...
ति तिच्याजागी बरोबर असेल किंवा डायरेक्ट नाही ही म्हणुन ,याची औकात काढुन याला दुखवायच नसेल, तिच काही ही असो, पण याच तिच्यावर किती प्रेम होत हे तिलाही चांगलच ठावुक होतं.
का ? कुणी आपल्यावर प्रेम केल्यावर आपणही त्यावर प्रेम कराव हा तिचा प्रश्न साधा होता..
आणी प्रेम लागत देण ते फक्त द्यायच परत मिळवण हा व्यवहार झाला..हा याचा विषय
या नुसार त्यानं त्याच चक्र चालुच ठेवलं तिच्या विषयी चीओढ, आतुरता आजही तितकीच ..
कारण त्या क्षणांना तो अजुन यामुळ जपतो कारण,
राग राग म्हणजे प्रेम नाही त्याग म्हणजे प्रेम असाव अस याला वाटतं
पण प्रेम मिळाव ही भावना सगळ्यांचीच ..पण प्रत्येकाची ज्याची त्याची ज्याणे त्याणे आपापल्या हिशोबाने आपल्या जिवनाची दोरी कुठे किती ताणायची किती कुठे सैल सोडायची हा प्रश्न ज्याच्या त्याचा त्यामुळे कुणावर काही लादण सुद्धा बरोबर नसत दोस्त ज्याचत्याल वाटाव हे महत्वाच नै का...
आयुष्याची वाट शेवाट पर्यंत चालायची . या वाटेत त्याला पुन्हा एकदा याची वाट पाहणारी मिळाली ..
याची वाट लागली नाही तर ,गाडी वाटावर आली..
@वाट चालावी चालावी...
Comments
Post a Comment