#माझं चालतबोलत विद्यापिठं
असंच काल परवा शेतात कापसाची पळाटी वेचुन ,गोळा करुन, फुकून देण सुरु होतं तर आई म्हणत होती. वागा सगळ्याच पळाट्या फुकुन देवु नको दोनेक फासाच्या राहुदे .. माझं मात्र फुकून देण सुरूच होतं.. मी आईला म्हटलो कशाला पळाट्या ठेवायच्या गँस ,शेगडी तर आहे ना घरी.. पण ते असुनसुद्धा आई कधी-कधी मातीच्या चुलीवर स्वयंपाक करतेच..आणी सरपन तर गेल्या वर्षी तर होत सुद्धा शेतात.. पण तरीसुद्धा भविष्याचा विचार करणारी आई या तिच्या वागण्यातुन खुप काही शिकवुन जाते.. ति म्हणतं होती की वागा " कुणी वेळप्रसंगी पिठं उसण देईल पण सरपण देत नसतं"
या तिच्या बोलण्यातुन खुप काही शिकुन गेलो.. ते म्हणजे हातचं सोडुन पळत्याच्या मागं कधीच लागायचं नसतं....आणी भविष्याचा विचार करणं आयुष्यात खुप महत्वाचयं जेणेकरुन आयुष्यात कधी कसी प्रसंग येईल सांगता येत नाही.. आणी स्वत च्या मनगटावर विश्वास ठेवुन जगत राहणं ..भलेही त्रास होईल पण स्वाभिमानानं जगण असलं.. ति शिकलेली नसुन अनुभवाच्या शिक्षणाची शिदोरी ही तिच्याजवळ न संपणारी आहे.. म्हणतात ना.
की जगावेगळ सुद्धा एक विद्यापिठं असंत मात्र अट एकच कि इथं प्रमाणपत्राची शाश्वती नसते..
Comments
Post a Comment