Posts

कुणाचंकायनकुणाचंकाय..

Image
#कुणाच काय..? कुणाला कुणाचं कौतुक असतं. कुणाचं कुणी भावविश्व असतं. कुणाला कुणाचं देणघेण नसतं. कुणाला कुणालातरी काही द्यायचं असतं. कुणाचं कुणावाचुन राहत नसतं. कुणाला कुणावाचुन राहवतही नसतं. कुणाला कुणी नसतं. कुणाला सगळे असुन कुणाचचं गांभिर्य नसतं. कुणाला कुणी आपलं म्हणुन विचारपुस करणारं, तर कुणाला कुणी मायेन तोंडावरुन हात फिरवणार हवं असतं. कुणाला कुणालातरी काही सांगायचं असतं, कुणाला कुणाचच ऐकायचं नसतं. तर कुणी कुणाचा एक बोल ऐकण्यास धजुन बसलेल असतं. कुणाचं हसु कुणाला जगायला बळ देतं , कुणी कुणावर मुद्दाम मात्र हसायचं नसतं. कुणाला कुणावर तरी रुसायचं असतं , कुणाला कुणाचं पाणावलेलं डोळं पुसायचं असतं. कुणाला कधी बोलायला कुणीच नसतं , कुणाला बप्पा बस कर किती बोलतो  असं म्हणायचं असतं, पण म्हणता येत नसतं. कुणाचं कुणाकडं काम असतं. कुणी कुणाकडं काम काढलेलं असतं. पाहिलं तर जग आपलं पाहिल तर कुणीच नसतं. कुणी कुणाला कुण्या वळणावर आठवत असतं. कुणी कुणाच्या मनात साठतं असतं. कुणी कुणाचा डोळा लावुन वाट पाहत असतं , कुणी कधी जातोय हा इथुन अस मनात म्हणत ताठत असतं.  कुणाला कुणाचही चांगलं व्...

तिची वाट ..

ती आजही दररोज प्रमाणे याच्या गावी येणार आहे , तो ही दररोज प्रमाणे अलाराम लावुन सकाळ होण्याची वाट बघत रात्रभर याच्या स्वप्नात तिचा विचार करत झोपी कधी गेला याचही याला कधीच कळाल नाही.. सकाळ झाली आलाराम वाजला हाही त्याच तयारीत कधी वाजतोन कधी नाही याच्या ,लगेच पाटदिशी आवरुन , कॉलेजच्या बँग मध्ये  एक दोन वह्या टाकुन खिशाला पेन लावत हेडफोन गळ्यात टाकत गावच्या एसटी पॉइंटकड गरबडीन निघाला  , हिवाळ्याचे दिवस रस्त्याच्या बाजुला शेकोटी केलेली  तिची वाट पाहत बसला तोवर शेकत,, तिची म्हंजी बसची याला तशी तिची वाट पाहण्याची गरज नव्हती कारण बसमधी फक्त कॉलेजच्या मुलीच घेवुन जायची ति बसही जवळच्या गावावरुन एक एक गाव करत मुली गोळा करत यायची लास्ट गाव याचचं,पण तिच्याशी याच नात त्याची ती त्यामधुन यायची म्हणुन जुळल होतं.. लांबुन धुराळा करत बस गावात येताना दिसतीय  ,तो होणारच पोरी म्हणलंकी विषयच नाही.. बस जसजस जवळ येईल तशी याचीही धकधक वाढत चाललीय, बस गावातुन वळुन माघारी येते कारण ती   जाताना पलिकडल्या बाजुला असल्यान दिसली नाही  यालाही माहितीच  होत ति कुठल्या सीटवर बसते म्हणुन...

#माझं चालतबोलत‌ विद्यापिठं

Image
असंच काल परवा शेतात कापसाची  पळाटी वेचुन ,गोळा करुन, फुकून देण सुरु होतं तर आई म्हणत‌ होती. वागा सगळ्याच पळाट्या फुकुन देवु नको दोनेक फासाच्या राहुदे .. माझं मात्र फुकून देण सुरूच होतं.. मी आईला म्हटलो कशाला पळाट्या ठेवायच्या गँस ,शेगडी तर आहे ना घरी.. पण ते असुनसुद्धा आई कधी-कधी मातीच्या चुलीवर स्वयंपाक करतेच..आणी सरपन तर गेल्या वर्षी तर होत सुद्धा शेतात.. पण तरीसुद्धा भविष्याचा विचार‌ करणारी आई या तिच्या‌ वागण्यातुन खुप काही शिकवुन जाते.. ति म्हणतं होती की वागा " कुणी वेळप्रसंगी पिठं उसण देईल‌‌ पण  सरपण देत‌ नसतं"    या तिच्या बोलण्यातुन खुप काही शिकुन गेलो.. ते म्हणजे हातचं सोडुन पळत्याच्या मागं कधीच‌ लागायचं नसतं....आणी भविष्याचा विचार‌ करणं आयुष्यात‌ खुप महत्वाचयं जेणेकरुन आयुष्यात कधी कसी प्रसंग‌ येईल‌ सांगता येत नाही.. आणी स्वत च्या मनगटावर विश्वास ठेवुन जगत राहणं ..भलेही त्रास होईल पण स्वाभिमानानं जगण असलं.. ति शिकलेली नसुन अनुभवाच्या शिक्षणाची  शिदोरी ही तिच्याजवळ‌ न संपणारी आहे.. म्हणतात ना. की जगावेगळ सुद्धा एक विद्यापिठं असंत मात्र अट एकच कि इथं प्रम...